सलमान रश्दी यांचा ‘धोक्याचा इशारा’ आपण ओळखू शकलो नाही...
जो गट असे म्हणतो की, शब्द हे शस्त्र आहेत, ते कदाचित एका बाबतीत सत्यच बोलतात. खरेच, नि:संशय शब्द तीक्ष्ण, धारदार, अपमानास्पद, किळसवाणे, अमानवीय असतात. वक्ता किंवा लेखक यांचा सार्वजनिक उपमर्द, कठोर टीका, तसेच त्यांचा निषेध करण्यापर्यंत शब्दांची मजल जाऊ शकते. पण सुसंस्कृत समाज आणि सैतानी (दंडेलशाही) समाज, या दोन्हीतला फरक ते शब्द आणि हिंसेची निवड कशी करतात, यावरूनच होत असते.......